वचननामा २०२५ - शिवसेना प्रभाग १४
सौ. सविता रामचंद्र सांगळे

सौ. सविता रामचंद्र सांगळे

शिवसेना उमेदवार | प्रभाग १४ - ब

माझ्यासाठी राजकारण हे केवळ पद नाही, तर लोकसेवेची एक पवित्र जबाबदारी आहे. मी तुमची नगरसेविका म्हणून उभी राहताना एकच वचन देते — तुमचा प्रत्येक प्रश्न हा माझा प्रश्न असेल, आणि त्याचे समाधान हेच माझे ध्येय असेल.

सेवा, सुरक्षा, विकास — हाच माझा मंत्र

प्रमुख सेवा योजना

नागरिकांच्या सोयीसाठी विविध विभाग

तात्काळ मदत

प्रभागात २४ तास रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन दल आणि आणीबाणी व्यवस्था उपलब्ध करण्यात येईल.

शिक्षण विभाग हेल्पलाइन

शैक्षणिक समस्यांसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येईल.

सुरक्षा व्यवस्था

सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस गस्त, महिला सुरक्षा हेल्पलाइन त्वरित कार्यान्वित.

विविध विभाग

सुव्यवस्थित प्रशासनासाठी

पोलिसांची गस्त

सीसीटीव्ही कॅमेरे आणि कसोन्या बसवून रात्रंदिवस सुरक्षा.

बससेवा

मुंबई, पनवेल, दापोली येथे सुविधा उपलब्ध करणे.

रोजगार विभाग

नवी मुंबईतील कंपन्या सोबत करार करून रोजगार संधी.

मैदान व क्रीडा

धारण सुसज्ज मैदान उभारणे व क्रीडा सुविधा पुरवणे.

कचरा व्यवस्थापन

ओला / सुका कचरा वेगळा करून नियमित उचल करण्यात येईल. घरोघरी प्रत्येक गल्लीमध्ये कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

100% स्वच्छता अभियान नियमित उचल

सफाई कर्मचारी & वाहने

प्रत्येक वॉर्डमध्ये कचरा गोळा करण्यासाठी वाहने, कर्मचारी आणि योग्य व्यवस्था करण्यात येईल. स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात येईल.

महिला सक्षमीकरण

शक्ती स्त्रीची... सशक्त नारीशक्ती

महिला बचत गट

महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार महिला बचत गट चालू करण्यात येईल.

शासकीय योजना

शासनाकडून येणाऱ्या सर्व योजना व उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.

व्यवसाय प्रशिक्षण

महिला उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व कौशल्य विकास कार्यक्रम.

जेष्ठ नागरिक सुविधा

पावणे गावातील जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा आणि विमा संरक्षण देण्यात येईल.

वैद्यकीय सुविधा विमा संरक्षण विरंगुळा केंद्र

ड्रेनेज व गटार विभाग

प्रभागातील सर्व गटारे व ड्रेनेज लाईन नव्याने व मोठ्या आकाराची उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती त्वरित करण्यात येईल.

विद्युत विभाग

पावणे गावातील सर्व स्ट्रीटलाईट दिवे दुरुस्त करणे व नवीन दिवे लावण्यात येतील. तसेच गरजेच्या ठिकाणी मोठ्या आकाराचे ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील.

स्ट्रीट लाईट
दुरुस्ती व नवीन
ट्रान्सफॉर्मर
नवीन बसवणूक

24×7 वीज पुरवठा

प्रभागात अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. वीज समस्या त्वरित सोडविण्यात येतील.

हेल्पलाइन: 1912
0+
गावे विकसित
0+
विकासकामे
0+
लाभार्थी नागरिक
0/7
नागरिक सेवा

१८ सूत्री विकास आश्वासने

प्रभाग क्र. १४ तुर्भे ते १४ गाव परिसर – प्रत्येक क्षेत्राचा सर्वांगीण विकास

मोरबे धरण पाइपलाइन

मोरबे धरणापासून पाइपलाइन टाकून पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात येईल.

सीसीटीव्ही कॅमेरे

संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारी व महिला सुरक्षा सुनिश्चित.

तलाव सुशोभीकरण व ज्येष्ठ केंद्रे

स्थानिक तलावांचे सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिक केंद्र व ओपन जिमची सोय.

दर्जेदार प्रसूती व बालरुग्णालय

Z.P. शाळेची जागा हस्तांतरित करून उच्च दर्जाचे प्रसूती व बालरुग्णालय.

सिमेंट रस्ते व गटार योजना

सर्व १४ गावांमध्ये सिमेंट काँक्रिट रस्ते, गटार व्यवस्था व सार्वजनिक शौचालये.

CBSE शाळा व स्पर्धा परीक्षा केंद्र

CBSE बोर्ड शाळा व UPSC/MPSC साठी अभ्यासिका व मार्गदर्शन.

महिला बचत गट सशक्तीकरण

प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन.

१४ गाव संकुल विकास

सर्व १४ गावांचा समग्र विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण.